अरुण अण्णा लाड : चरित्र, राजकीय पक्ष, कारकिर्द आणि दृष्टी

Arun Anna Lad

भारतीय राजकारणी

अरुण अण्णा लाड हे कुंडल, महाराष्ट्रातील एक दूरदर्शी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड, कुंडलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष आहेत. 29 ऑक्टोबर 1947 रोजी येळ्ळूर, सांगली येथे क्रांतिकारक दांपत्य क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड आणि क्रांतिवीरांगना विजयाताई लाड यांच्या पोटी झाला. त्यांना त्यांच्याकडून न्याय आणि सामाजिक सुधारणांचा वारसा मिळाला. कृषी, शिक्षण आणि पर्यावरणीय जनजागृती करण्यात अरुण अण्णा लाड सातत्याने क्रियाशील आहेत. क्रांतिकारी आदर्शांचा मजबूत पाया असलेले अरुण अण्णा लाड यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून कृषी विषयात पदवी मिळवून नव समाज निर्मिती आणि प्रगतीसाठी सातत्याने आग्रही राहिले आहेत.

अरुण अण्णा लाड चरित्र

पूर्ण नावअरुण जी डी लाड (अरुण अण्णा लाड)
जनसामन्यातील नावअण्णा
व्यवसायराजकारणी, समाजसेवक
ओळख• विधानपरिषद सदस्य (महाराष्ट्र)
• विधानपरिषद सदस्य (महाराष्ट्र)
• अध्यक्ष, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड फाऊंडेशन, कुंडल
• अध्यक्ष, क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट, कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड मेमोरिअल ट्रस्ट, कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड समाज जागृती ट्रस्ट, कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ज्ञानपीठ, कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिअग्रणी समाज प्रबोधन संस्था, कुंडल
• अध्यक्ष, गांधी एज्युकेशन सोसायटी, कुंडल
• अध्यक्ष, सुलोचना भट ओद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कुंडल
• मार्गदर्शन संचालक, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिसिंह नाना पाटील सहकारी शेतीमाल प्रक्रीया व शीतगृह संस्था, कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड कुस्ती प्रशिक्षण केंद्र, कुंडल
• अध्यक्ष, क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह, कुंडल
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट
वय78 वर्षे
जन्म29 ऑक्टोबर 1947
जन्मस्थानयेल्लूर, महाराष्ट्र.
मूळ गावकुंडल, महाराष्ट्र.

त्याचे कुटुंब आणि नातेवाईक

वडीलक्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड
आईक्रांतीवीरंगणा विजयाताई लाड
भाऊप्रकाश, उदय, किरण, दिलीप 
बहीणN/A
बायको सौ. प्रमिला अरुण लाड

त्याचे शिक्षण आणि शाळा, कॉलेज

शैक्षणिक पात्रताकृषी विषयातील पदवी
शाळाजिल्हा परिषद शाळा, कुंडल; प्रतिनिधी हायस्कूल, कुंडल.
महाविद्यालय / विद्यापीठकृषी महाविद्यालय, सांगली; कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.

समाजसेवा आणि राजकारणाचा वारसा

अरुण अण्णा लाड : बेरोजगारी, महागाई, निरक्षरता आणि पाण्याची टंचाई यांसारख्या प्रमुख समस्यांवर लक्ष वेधून अरुणअण्णा लाड त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच समाजसेवेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. अण्णांनी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन संस्था आणि इतर संस्थांना सोबत घेऊन अनेक यशस्वी आंदोलने उभी केली, त्यांनी शिक्षण, कृषी, पर्यावरण संवर्धन आणि सहकारी संस्थांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून ते महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीला प्रोत्साहन देण्यात अग्रेसर आहेत.

शिक्षणासाठी समर्थन

अरुण अण्णा लाड : अरुणअण्णांनी विद्यार्थ्यांची फी माफी, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शैक्षणिक देणग्या रद्द करण्याच्या मोहिमांचे नेतृत्व केले आहे. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण वाचवा अभियान आणि कमवा आणि शिका कार्यक्रम यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देतात. महिलांसाठी आयटीआय आणि ग्रामीण भागात मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रे स्थापन करून, एकविसाव्या शतकाच्या स्पर्धेत टिकणारी व कौशल्यपूर्ण असणारी युवापिढी तयार व्हावी यासाठी ते सतत कार्यरत असतात.

शेतकऱ्यांना आधार

अरुण अण्णा लाड : एक कृषी पदवीधर आणि शेतकरी म्हणून, अरुणअण्णा शेतकऱ्यासमोरील असणारी आव्हाने समजून घेतात. शेतीला परवडणारे पाणी आणि वीज, वाजवी कृषी धोरणे आणि बियाणे आणि खतांसाठी वाजवी किंमत या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या चळवळीचे संघटन आणि नेतृत्व करतात. इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून ते शेतकरी हितांचे रक्षण करण्यासाठी सतत कार्यमग्न असतात.

सहकार विकासातील नेतृत्व

अरुण अण्णा लाड : अरुणअण्णांच्या नेतृत्वाखाली क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यासारख्या सहकारी संस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा करत यशाच्या मानकरी ठरल्या आहेत. सह-वीजनिर्मिती प्रकल्प, वाजवी वेतन आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आणि कर्मचारी यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. सहकार क्षेत्राची विश्वासार्हता वाढविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

महिला सक्षमीकरण

अरुण अण्णा लाड : अरुणअण्णांनी महिला सक्षमीकरणासाठी स्वयं-सहायता गट, क्रांती गारमेंट, क्रांती दूध उत्पादने आणि क्रांती शाळांसह अनेक उपक्रम राबवले आहेत. ते भ्रूणहत्या आणि लिंग-आधारित हिंसाचार यांसारख्या सामाजिक अन्यायाविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवतात. आधुनिक ITI आणि उद्योगाद्वारे महिलांना स्वावलंबी बनवून; प्रबोधन, संघटन करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम अग्रेसर असतात.

पर्यावरणीय योगदान

अरुण अण्णा लाड : 70व्या वाढदिवसानिमित्त अरुणअण्णांनी 70,000 झाडे लावण्याची मोहीम सुरू केली. ज्याला स्थानिक शेतकरी, संस्था आणि वन विभाग यांनी पाठिंबा दिला. या प्रयत्नाला 2017 मध्ये उत्कृष्ट सामाजिक वनीकरण उपक्रमांसाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला.

संस्थात्मक प्रभाव

अरुण अण्णा लाड : अरुणअण्णांनी अनेक संस्था स्थापन करून त्यांचे पालनपोषण केले आहे. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड फाऊंडेशन, क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, सत्येश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था, बसवेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था, तुपारी-दह्यारी-घोगाव-गणेशवाडी सहकारी पाणीपुरवठा संस्था, शेती पदवीधर कृषी-उद्योग विकास सहकारी सोसायटी लि., क्रांती गारमेंट, क्रांती मिल्क प्रोसेसिंग सहकारी क्रेडीट सोसायटी, क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, क्रांतिअग्रणी समाज प्रबोधन संस्था आणि क्रांतिसिंह नाना पाटील सहकारी शेतीमाल प्रक्रिया व शीतगृह संस्था ही विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची उदाहरणे आहेत. कै. विजयकुमार (दादा) लाड सार्वजनिक वाचनालय, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड कुस्ती प्रशिक्षण केंद्र, कुंडल ग्रेप ग्रोअर्स सहकारी सोसायटी आणि गांधी एज्युकेशन सोसायटी यासारख्या प्रबोधन करणाऱ्या. संस्था व त्यांचे प्रशासन यशस्वीरित्या चालविण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

पदवीधर एमएलसी आणि विधान योगदान

अरुण अण्णा लाड : 2020 मध्ये अरुणअण्णांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विक्रमी मतांनी जिंकली. एमएलसी म्हणून ते शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारातील धोरणात्मक सुधारणांसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. आंदोलने, मोर्चे आणि विधिमंडळात वैधानिक मार्गाने बेरोजगारी, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षक विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकार आणि प्रशासनाकडे आपली ठाम भूमिका व्यक्त केली आहे.

त्याचे सोशल मीडिया हँडल्स

वेबसाइटआता भेट द्या
लिंक्डइनआता भेट द्या
एक्सआता भेट द्या
फेसबुकआता भेट द्या
इंस्टाग्रामआता भेट द्या

Related Articles

Also Read About जी डी बापू लाड : सामाजिक न्यायाच्या एका चरित्रकाराचे चरित्र

Thank You!

3 thoughts on “अरुण अण्णा लाड : चरित्र, राजकीय पक्ष, कारकिर्द आणि दृष्टी

Leave a comment