
शरद फाउंडेशन कुंडल
शरद फाउंडेशन कुंडल संचलित शरद आत्मनिर्भर अभियानांतर्गत समाजातील गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये गरजू लोकांना वैदयकीय सुविधा, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यापासून त्यांच्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक हातभाराची मदतही पोहचवली जाते.
शरद फाउंडेशन कुंडल (माहिती)
| संस्थेचे नाव | शरद फाउंडेशन कुंडल |
| संपर्क क्रमांक | ९९७०३३०७९० |
| ईमेल आयडी | sharadfoundation55@gmail.com |
| प्रेरणा | अरुण अण्णा लाड |
| अध्यक्ष | सौ. धनश्री शरद लाड |
| संस्थेची स्थापना | २१ फेब्रुवारी २०२३ |
| मुख्यालय | कुंडल, महाराष्ट्र |
| Origin | महाराष्ट्र, भारत |
संस्थेची उद्दिष्टे
- रक्तदान शिबिर व गरजूंना रक्तपुरवठा
- नेत्र तपासणी शिबिर
- बांधकाम कामगार नोंदणी
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
- सर्व प्रकारचे दाखले मेळावा
- आरोग्य तपासणी शिबिर
- ज्येष्ठ नागरिक योजना
- बाल संगोपन योजना
- मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष
- महिला सक्षमीकरण
- हूदय रोग तपासणी शिबिर
- संजय गांधी, शावण बाळ, अपंग पेन्शन योजना
- अपंग प्रमाणपत्र
- लेक लाडकी योजना
- प्रधानमंत्री मातृ योजना
- विवाह नोंदणी
याबरोबरच दारिद्य रेषेखालील गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच असंख्य वेगवेगळे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात.
छायाचित्र संग्रह












सर्व विभागीय संघटक यांचा वार्षिक अहवाल

संस्थेच्या उपक्रमांबाबत थोडक्यात
शरद फाउंडेशन कुंडल : शरद आत्मनिर्भर अभियानामार्फत पलूस व कडेगाव तालुक्यांमध्ये प्रत्येक महिन्याला रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. समाजातील कोणत्याही व्यक्तीस रक्ताअभावी जीव गमवावा लागू नये म्हणून प्रत्येक गरजूस मोफत रक्तपुरवठा केला जातो. “कधीही, कितीही, कुठेही, कोणालाही” या उक्तीप्रमाणे रक्तदानाचे कार्य अविरतपणे चालू आहे.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व मोफत नोंदणी कार्यक्रम राबविण्यासाठी शरद आत्मनिर्भर विशेष प्रयत्नशील आहे. विदयार्थी शिष्यवृत्ती, बांधकाम साहित्य, संसार संच, विमा संरक्षण, प्रसुती लाभ, लग्नासाठी अर्थसहाय्य अशा 2000 पेक्षा जास्त लाभार्थीना लाभ देणेत आज अखेर संस्था यशस्वी झाली आहे.
शरद फाउंडेशन कुंडल : शासकीय बाल संगोपन योजनांचा लाभ गरजू बालकांना मिळवून देण्याबरोबरच किचकट नियम अटींच्या अभावी काही बालकांना शासकीय लाभ मिळत नाही. अशा बालकांना संगोपनासाठी दत्तक घेणे हा मुख्य उददेश ठेऊन शरद आत्मनिर्भर काम करीत आहे. या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, बेघर, शारिरीक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी दरमहा 1100/ रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. आजअखेर 126 बालकांना नियमितपणे याचा लाभ मिळत आहे.
शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शरद आत्मनिर्भर तत्पर आहे. आर्थिक मागास असलेल्या घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रीच्या निधनानंतर त्यांच्यावरती ओढवलेल्या संकटातून त्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी व एक आधार म्हणून एकरकमी 20 हजार रुपये त्या कुटुंबाला अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ मिळवून देण्यात संस्था यशस्वी झाली आहे.
शरद फाउंडेशन कुंडल : दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विशेष मोहिम शरद आत्मनिर्भरमार्फत राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबर कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणं, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनेची अंमलबजावणी सातत्याने मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. पलूस व कडेगाव तालुक्यातील अनेक निराधारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात शरद आत्मनिर्भर यशस्वी झाले आहेत आणि लाभार्थी शोध कार्य चालू आहे.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या आयोजनाबरोबर रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शरद आत्मनिर्भर विशेष प्रयत्नशील आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष मदत, मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवून आज अखेर ७७१ हून अधिक नागरिकांची शस्त्रक्रिया मोफत करणेत आल्या असून ९००० हून अधिक रुग्णांनी यामध्ये तपासणी करून घेतलेली आहे. हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करून आज अखेर ९०० हून अधिक रुग्णांची तपासणी करणेत आल्री आहे. आभा कार्ड कॅम्प यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे.
रेशन कार्ड संबंधीत त्रुटी दूर करण्यासाठी शरद आत्मनिर्भर नियमित कार्यरत असते. रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे, कमी करणे, नवीन रेशनकार्ड देणे इ. कामे शरद आत्मनिर्भर मार्फत मोफत केली जातात.
निष्कर्ष
शरद फाउंडेशन कुंडल : शरद आत्मनिर्भर अभियान समाजातील गरजू आणि वंचित लोकांसाठी एक प्रभावी आणि समर्पित संस्था आहे. रक्तदान शिबिर, बाल संगोपन योजना, आरोग्य तपासणी शिबिर, आर्थिक मदत, आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंना पोहोचविण्याचे कार्य संस्थेने अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहे. या माध्यमातून समाजातील विविध स्तरांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न हे शरद आत्मनिर्भर अभियानाचे खरे वैशिष्ट्य आहे. “समाजसेवेच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे” हा या संस्थेचा संदेश आहे आणि तो यशस्वीपणे जनमानसात पोहोचला आहे.
त्यांचे सोशल मीडिया हँडल
Related Articles
Also Read About G D Bapu Lad Memorial Trust Kundal (Marathi) Vision And Initiatives
धन्यवाद!

3 thoughts on “शरद फाउंडेशन कुंडल : व्हिजन आणि उपक्रम”